सोलापूर | ३ ऑगस्ट २०२५
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम राबवण्यात आला. ति-हे (ता. उत्तर सोलापूर) येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मुक्ताई कंट्रक्शन आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते.
या उपक्रमात युवा नेते पृथ्वीराज माने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पाटी, कंपास बॉक्स आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना पृथ्वीराज माने म्हणाले, “आदरणीय दिलीप माने साहेबांचा वाढदिवस साजरा करताना हारतुरे व खर्चाऐवजी गरजूंना मदत करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य देणे हे अधिक योग्य ठरेल. या उपक्रमामधून समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते.”
कार्यक्रमाला मुक्ताई कंट्रक्शन सीईओ अनिल शिंदे, सरपंच गोवर्धन जगताप, सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटील, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष गोविंद सुरवसे, गणेश शिंदे, शंकर घंदुरे, उद्योजक सैफनभाई शेख, फायनान्स ऑफिसर इरफान शेख, भारतीय रेल्वेचे अधिकारी प्रमोद कांबळे, सचिन सासणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय साहित्याचे वाटप झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. कार्यक्रमाच्या शेवटी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिलीप माने यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत उपस्थितांचे आभार मानले.
0 Comments