केरळ मधील मल्याळम भाषेतील प्रमुख मनोरमा न्यूज चॅनल २०२५ च्या कोची केरळ येथे झालेल्या संमेलनात सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आजचा निवडणूक आयोग बोलायलाही घाबरतो आणि तो भाजपचा प्रवक्ता बनून बसला आहे. आयोगाची स्वायत्तता संपुष्टात आली असून लोकशाहीवर गंभीर गदा आली आहे. भाजप सरकार जनतेचा आवाज दाबण्याचे काम करत आहे, विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशाच्या संविधान, स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर सातत्याने आघात होत असल्याचा त्यांनी आरोप केला.
पुढे बोलताना काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा उल्लेख करत खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ठामपणे उभा आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस समता, न्याय आणि स्वातंत्र्य यासाठी संघर्ष करत आहे. भाजप सरकार आणि निवडणूक आयोगाला कठोर शब्दांत लक्ष्य करत लोकशाही वाचवण्याचा काँग्रेसचा निर्धार अधोरेखित केला.
या संमेलनात सहभागी झालेले प्रमुख मान्यवर केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, खासदार व आसाम प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गौरव गोगोई, CPI(M) राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन, केरळ काँग्रेस अध्यक्ष सनी जोसेफ, भाजप केरळ अध्यक्ष राजीव चंद्रशेखर, खासदार, बेंगळुरू दक्षिण व BJYM प्रमुख तेजस्वी सूर्या, डॉ. ए. व्ही. अनुप, ए. के. शाजी, प्रकाश वर्मा, असीफ अली, जीतू जोसेफ, श्वेता मेनन, उन्निमाया प्रसाद, विजू चाको, बोस वर्गीज, राम मोहन पालयथ, वर्षा रमेश, डॉ. टॉम एम. जोसेफ, ऑर्वेल लायोनेल यांच्यासह राजकीय नेते, उद्योगपती, चित्रपटक्षेत्रातील कलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments