*हिंदू धर्मामध्ये गणपतीला फार महत्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिवपार्वतीचा पुत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते. पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे व त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी हा उदात्त हेतू ग्राह्य धरून 1894 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यातील विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली. असाच गणेशोत्सव आज सर्वत्र जल्लोषात साजरा होत आहे. आपल्या न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक) कोर्टी, पंढरपूर मध्ये गणरायाचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले .श्रीच्या प्रतिस्थापनेची पूजा प्राचार्य विक्रम लोंढे सर यांच्या हस्ते करण्यात आली.*
*यावेळी प्राचार्य विक्रम लोंढे सर,संस्था प्रतिनिधी मा.श्री.ज्ञानेश्वर शेडगे साहेब , ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड सर, रजिस्ट्रार श्री .संतोष कवठेकर सर,सर्व विभाग प्रमुख, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते*
0 Comments