पंढरपूर दि. 05 डिसेंबर 2025 — पंढरपूर उपविभागीय कार्यालय तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अवैध वाळू उत्खनन आणि साठ्यावरील मोठी धडक कारवाई करत ५२,३४,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक JCB, एक टिपर (वाळूसकट), एक लाल रंगाची स्विफ्ट कार आणि मोबाईल असा मोठा अवैध साठा व वाहने ताब्यात घेण्यात आली.
कशी उघड झाली वाळू माफियांची कारस्थाने?
पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांना गुप्त माहिती मिळाली की इसबावी परिसरातील ५२ एकर भागातील सिमेंट रोडलगत मोकळ्या मैदानात झुडूपाच्या आडून भीमा नदीपात्रातून चोरीच्या वाळूचा साठा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विशेष पथकाने छापा टाकला.
रेकीसाठी लाल रंगाची स्विफ्ट कार उभी असल्याचे दिसले.काही वेळात एक टिपर तेथे आला आणि JCB च्या सहाय्याने वाळू भरण्यास सुरुवात झाली.पोलिसांना पाहताच दोन संशयित स्विफ्ट कारमधून पळण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून कार पकडली आणि टिपर व JCB चालकांनाही ताब्यात घेतले.
पकडलेले आरोपींची नावे व पत्ता
1. सिद्धनाथ भागवत इंगोले, रा. गादेगाव, ता. पंढरपूर,2. महेश तानाजी शिंदे, रा. इसबावी,3. हनुमंत धनाजी जाधव, रा.वाखरी,4. परमेश्वर महादेव माने, रा. बोहाळी आणि जप्त केलेला मुद्देमाल - 1 पिवळ्या रंगाचा JCB (विना नंबर) 25,00,000 ,2 -पांढरा टाटा हायवा टिपर (वाळूसकट, विना नंबर) 20,24,000,
3 -लाल रंगाची स्विफ्ट कार (विना नंबर) 7,00,000,4 - Samsung काळा मोबाईल 10,000 असा एकूण 52,34,000 रुपये आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शहर पोलीस पथकाच्या तात्काळ आणि संयुक्त कारवाईमुळे मोठा अवैध वाळू साठा उध्वस्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से)अप्पर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे (भा.पो.से) यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके,पोहेकॉ निलेश रोंगे,पोना विनोद शिंदे, पोकों शिवशंकर हुलजंती,पोका राहुल लोंढे,पोसई पिसाळ, पोकॉ धनाजी मुटकुळे,पोहवा विनोद चौगुले यांनी पार पाडली.

0 Comments