LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२८ वी जयंती व स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करण्यात आली. 
         सुरवातीला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन संस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर डॉ. सूरज रोंगे यांनी ‘युवाशक्तीची देशाला असणारी गरज आणि त्या माध्यमातून राष्ट्र विकासासाठी युवकांचे अतुलनीय योगदान यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून माँसाहेबांच्या कार्याची ओळख करून देताना त्यांनी इतिहासातील शौर्याचे अनेक दाखले यावेळी दिले. यावेळी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा)चे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस)च्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. यु.एल.अनुसे, एम.बी.ए च्या विभागप्रमुख डॉ. एम.एम.भोरे, डॉ.पी.ए. सातारकर, डॉ.बामणे, प्रा. ए.बी.कोकरे, प्रा. सुनिल भिंगारे, प्रा. रोडगे, प्रा. मोरे, प्रा. कृष्णा तेलंग व इतर प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments