LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी आमदार अभिजीत पाटील मैदानात**ही तर कार्यकर्त्यांची निवडणूक त्यांना ताकद देऊन उतणार मैदानात उतरणार*(भाळवणी, रोपळे, गोपाळपूर, वाखरी गटांमध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी गावोगावी घेतल्या बैठका)


सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काही दिवसांमध्येच निवडणुका लागणार असल्याने पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी भाळवणी, रोपळे, गोपाळपूर, वाखरी या गटांतील प्रत्येक गावांमध्ये घोंगडी बैठका घेत कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून आमदार अभिजीत पाटील यांचे गावोगावी जंगी स्वागत करण्यात आले. यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाले असून सर्व ताकदीने आपण निवडणूक लढवणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.

सध्या आमदार अभिजीत पाटील यांनी गाव दौरे सुरू करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेत आहेत. आपल्यातीलच इच्छुक उमेदवार कोण असावा याबाबतचा चाचपणी करत आहेत. नागरिकांना जो हवा असलेला उमेदवार तोच दिला जाईल.जनतेची कामे करणारा जनतेची सेवा करणारा आपल्यातील युवकांना संधी देण्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

गाव दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून तुम्ही जो उमेदवार द्याल तो आम्हाला मान्य असेल आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीन असा शब्दही नागरिकांनी आमदार अभिजीत पाटील यांना यावेळी दिला.

यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक आजी माजी संचालक व भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, विविध सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त अध्यक्ष गाव पोलीस पाटील अनेक जण यावेळी उपस्थित होते.
--------------------------------------
*चौकट :*

अभिजीत पाटील
आमदार, माढा विधानसभा

मी जरी माढा मतदारसंघात निवडून आलो असलो तरी विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्र हे संपूर्ण पंढरपूर तालुका असून माझ्यासाठी आमदारकीच्या विजयामध्ये रात्रीचा दिवस करणारे त्यांच्यासाठी मी रात्रीचा दिवस करून त्यांच्यासाठी ही निवडणूक लढवणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. आपल्याच विचाराचा जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य दिल्याने विकास कामांना नक्कीच गती मिळेल.

Post a Comment

0 Comments