पंढरपूर येथील न्यू सातारा महाविद्यालयात संगणक व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या “Coder 24 Hour Hackathon 2.0” या राष्ट्रीय स्तरावरील 24 तासांच्या हॅकाथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्रो अजुअर सॉफ्टवेअर सोलुशन पुणे, व्यापमेब ग्लोबल बिझनेस सर्विसेस पंढरपूर, लाईट कोड सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड नऱ्हे, बाईट ब्रिलियन्स आणि कोड सॉफ्टेक प्रायव्हेट लिमिटेड नऱ्हे यांच्या सौजन्याने प्रायोजित करण्यात आला होता.
या हॅकाथॉनमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यांतील अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, आयटी आणि एमसीए विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. 33 हजार रुपये पूल प्राईज ठेवलेल्या या हॅकॅथॉन कडे विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.24 तास सलग चाललेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रिअल-लाईफ प्रॉब्लेम्स, स्टार्टअप आयडिया, वेब अॅप्लिकेशन, मोबाईल अॅप्स, AI/ML, सायबर सिक्युरिटी व स्मार्ट सोल्युशन्स अशा विविध विषयांवर आधारित प्रकल्प सादर केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वर्ल्ड लाईन ग्लोबल सोल्युशन, पुणे येथील लक्ष्मण देठे व नेस डिजिटल इंजिनिअरिंग चे ओनर नितीन माने हे लाभले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “ हॅकॅथॉन सारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांसोबतच समस्या सोडवण्याची क्षमता, संघभावना आणि वेळेचे नियोजन विकसित करतात,” असे मत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी तांत्रिक उत्कृष्टता, सहकार्य व समस्या सोडवण्याच्या क्षमतेला नवीन आयाम देऊ शकतील.
या स्पर्धेदरम्यान Byte Brilliance आणि Code SoftTech येथील तज्ज्ञ मेंटॉर्सनी विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन केले. कोडिंग, डिझाइन, लॉजिक बिल्डिंग आणि प्रेझेंटेशन यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी केली. परीक्षकांनी प्रकल्पांचे नाविन्य, उपयुक्तता, तांत्रिक अचूकता आणि सादरीकरण या निकषांवर मूल्यमापन केले.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एन. के.ऑर्चिड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड पटकविला , तर व्हीआयटी पुणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेस्ट चॅम्पियनशिप अवॉर्ड, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेस्ट इंडस्ट्री प्रोजेक्ट अवॉर्ड, ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी अकलूज या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेस्ट वुमन इंन टेक अवॉर्ड, न्यू सातारा कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक कोर्टी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेस्ट रायझिंग टॅलेंट अवॉर्ड तर श्री विठ्ठल एज्युकेशन रिसर्च अँड इन्स्टिट्यूट या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेस्ट थिमॅटिक अवॉर्ड पटकावून घवघवीत यश संपादन केले.
या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य विशाल बाड, इव्हेंट हेड विक्रम माळी, इव्हेंट कॉर्डिनेटर मिस पूजा सरवदे , कल्चरल हेड सचिन पुरी,प्राध्यापक वर्ग,आयोजन समिती, स्वयंसेवक विद्यार्थी तसेच प्रायोजक संस्थांचे विशेष कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सपना दोडमिसे यांनी केले.अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

0 Comments