LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आठ सिलेंडर जप्त, ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पंढरपूरात घरगुती व व्यवसायीक गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी कारवाई 

पंढरपुरात वाढतोय गॅसचा अवैध व्यवसाय;एका आरोपीसह चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर(प्रतिनिधी):- सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासन व सोलापूर जिल्हा पुरवठा प्रशासनाने घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर टाळण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. 

दरम्यान पंढरपूर शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अवैदरीत्या गॅसचा व्यवसाय सुरू असल्याने याची माहिती मिळताच शहरातील सांगोला चौक येथील केंद्रे महाराज माठासमोर असणाऱ्या गाड्यांमध्ये पोलीस प्रशासन व पुरवठा विभागाने धाड टाकून तेथे सुरू असलेला अवैध गॅसचा व्यवसाय बंद केला. यामुळे गॅसचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात पथक कार्यरत असून पंढरपूर तालुक्यातील पथकाने तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई केली.  

पथक प्रमुख विजय तुकाराम बादल (पुरवठा निरीक्षक) व पुरवठा सहाय्यक उमेश हिंगमिरे यांनी मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजता सांगोला रोड, केंद्रे महाराज मठा समोर येथे धाड टाकली. या ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर होत असल्याचे आढळून आले.  

कारवाईदरम्यान घरगुती वापरातील आठ सिलेंडर टाक्या व व्यावसायिक वापरातील पाच सिलेंडर टाक्या जप्त करण्यात आल्या. गॅस भरण्याचे साहित्य, इलेक्ट्रिक काटा, मशीन आदी सुमारे ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गणेश राजू बोरीकर (वय २४, रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मागणीप्रमाणे गॅस सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहेत. तरीही युद्धजन्य परिस्थिती पाहता गॅस सिलेंडरचा काटकसरीने वापर करावा, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच शासनास सहकार्य करावे.  
             
दरम्यान तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये शहराच्या विविध भागात अवैधरित्या घरगुती व व्यावसायिक गॅसचा व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे.? एकीकडे स्वयंपाकाला गॅस मिळत नसताना दुसरीकडे मात्र वाहनात व इतर ठिकाणी गॅसचा अवैधरित्या व्यवसाय सुरू आहे.? यापूर्वीही पोलीस प्रशासनाने व पुरवठा विभागाने कारवाई केली परंतु तरीही कोणाच्या आशीर्वादाने हा व्यवसाय सुरू आहे अशी उलट सुलट चर्चा सध्या पंढरपूरात होताना दिसते.

Post a Comment

0 Comments