LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीचे १२ व्या राष्ट्रीय तांत्रिक प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा ‘सृष्टी-२०२६’ मध्ये घवघवीत यशकेरळ या राज्यात फडकला स्वेरीचा झेंडा



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ‘सृष्टी-२०२६’ या तांत्रिक प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा महोत्सवात उल्लेखनीय यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावर स्वेरी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. इतर राज्यात आयोजित करण्यात आलेल्या संशोधन स्पर्धात देखील स्वेरीचे विद्यार्थी सहभाग घेवून यश मिळवत आहेत. त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
          केरळ राज्यात कोट्टायम मधील सेंटगिट्स अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २३ व दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ही स्पर्धा पार पडली. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विभागप्रमुख डॉ.एस. बी. भोसले यांच्या नेतृत्वाखाली मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळविले आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातून महाराष्ट्रातून निवडलेला स्वेरीचा एकमेव ग्रुप असल्यामुळे विजेतेपदाचा क्षण महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी अभिमानाचा ठरतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून संपूर्ण भारतातून ७३ प्रकल्पांची नोंदणी झाली होती. त्यापैकी उत्तम म्हणून गौरविलेले १० प्रकल्प राष्ट्रीय स्तरासाठी निवडले गेले. या उत्तम प्रकल्पात स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी विशेष चमकदार कामगिरी केली. यामध्ये मानसी महेश कंदी, शुभांगी युवराज सगर, गोविंद आनंद भंडारे व आशिष सिद्धेश्वर शिंदे यांनी‌ पदवी स्तरावर असलेल्या ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ या गटात तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात ‘अॅटोमेटीक सिडबॉल मेकिंग मशीन’चे सादरीकरण केले होते. या प्रकल्पाचा फायदा पर्यावरणचे संतुलन राखण्यासाठी होतो. केरळ मध्ये तेथील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉ. मन्नू रेमनन तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून गौरव केला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.चेतन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन क्षेत्रात स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्धल संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, विश्वस्त बी.डी. रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, संस्थेंअंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, इतर विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या संशोधन प्रकल्पाचे कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments