LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शाळेत चांगले शिक्षणासोबत उत्तम शिस्त व संस्कार दिले जातात समाजसेवक मुजम्मील कमलीवाले



पंढरपुर (प्रतिनिधी)
आदर्श बाल व प्राथमिक मंदिर येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गाणी आणि भाषणांच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. चौथीतील विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी सांगत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला समाजसेवक मुजम्मील कमलीवाले हे पालक म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, या शाळेत मुलांना चांगल्या शिक्षणासोबतच उत्तम शिस्त व संस्कार दिले जातात. त्यांनी सर्व शिक्षिकांचे मनापासून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या मेहनतीचे अभिनंदन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका माया सांगोलकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. तसेच महिला पालकांसाठीही अनेक उपयुक्त उपक्रम शाळेत राबविले जातात, असे त्यांनी नमूद केले. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर लहान मुलांनी पोहण्यासाठी अनोळखी ठिकाणी जाऊ नये, तसेच आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकच्या डब्यांचा वापर टाळावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. आनंद, भावना आणि आठवणींनी भरलेला हा निरोप समारंभ सर्वांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला.द.ह.कवठेकर चे मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी यांनी द.ह.कवठेकर शाळे बद्दल माहीती सांगीतली.
यावेळी शिक्षिका रंजनी देशपांडे , संगिता कोकणी , प्रणोती कुलकर्णी, भक्ती उत्पात तसेच द.ह.कवठेकर चे मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments