LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

तोच बुडवितो तोच तारूनी नेणार, मनाचिया घावावरी मनाची फुंकर

बुवाबाजी ! 
                   राज्यातलं बातम्यांचे वादळ काही शमत नाही आणि बुवाबाजीचे प्रकार उघडकीस येणे थांबत नाही असा काहीसा प्रकार घडत आहे. प्रत्येक ब्रेकिंग न्यूज मध्ये वेगवेगळे नवीन विषय चर्चा आपल्याला समजत आहेत . जादूचे प्रयोग बघताना आनंद होतो पण जेव्हा त्या जादूगाराची हातचलाखी लक्षात येते तेव्हा मूड ऑफ होतो , आणि अरेच्चा हे असे करत होता तर तो जादूगार त्यात काय मग खास विशेष? असे वाटते प्रत्येकाला . अडचण अशी की , जादूगाराची हातचलाखी लक्षात यायला वेळ लागतो आणि तोपर्यंत तो जादूगार महान बनलेला असतो अगदी प्रत्येकाच्या मनात. 
                             सर्वांनी प्रथमतः मूळ गोष्ट किंवा तत्त्व मान्य करून स्वतःच्या मनाची खुणगाठ बांधून घेतली पाहिजे की , ह्या युगात चमत्कार , साक्षात्कार होऊन आशीर्वाद मिळू शकत नाही आणि असे पैसे उकळून लुबाडणाऱ्या सो कॉल्ड आधुनिक स्वयंघोषित लोकांकडून तर नाहीच नाही . एकदा हे ठरवून समजून घेतले की पुढे विचार करायला सुरुवात करता येईल. 
             जन्म-मरण, हार-जीत, साडेसाती-उत्कर्ष, संपत्तीचा ऱ्हास-भाग्योदय ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात त्यामुळे आपण कसा प्रतिसाद देत प्रयत्न करायचे आपल्या हातात आहे . मला एकच माझे व्यक्तिगत मत सांगावे वाटते की,
भक्ती,श्रद्धा,विश्वास ,नामस्मरण, पूजा करावी जरूर पण अतिरेक न करता आणि निस्वार्थ भावना मनात बाळगून करावी. ज्याने आपल्याला जीवन प्रदान केले त्याला आपण आपल्या इच्छापूर्ती साठी काय देणार हो ? चांगले कर्म आणि नित्य नामस्मरण आपल्याला सर्व काही मिळवून देऊ शकते अगदी सहज. 
                  देवाला कौल मागणे ,नवस करणे हे सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले आहे असे उदाहरण आहे असे समजा ! पण तिथे जाण्यापूर्वी काही मागण्यापूर्वी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. सत्र न्यायालयात न जाता थेट सुप्रीम कोर्टात न्याय मागावा हे उचित नाहीच मुळी. जर आपण कुटुंबात,समाजात ,आपल्या परिसरात सर्वांना समजून घेत एकोप्याने सामंजस्य भूमिका घेतली आणि वावरलो तर कोणत्याही कठीण काळात आपल्या हाकेला माणसे धावून येतात आणि मदत करण्यासाठी जीव पणाला लावतात. अशी कित्येक उदाहरणे आपल्या पैकी अनेकांनी स्वतः पाहिली आणि अनुभवली आहेत,हो ना ! 
                       सामाजिक,राजकीय विषमता वाढत चालली आहे त्यामुळे माणसे दूर होत आहेत. प्रत्येकजण एकमेकांना मदत करणे दूर उलट त्याच्या अडचणीत मला काय फायदा होईल याचा विचार करतोय आणि वागतोय.बुवाबाजी ह्याच कारणाने वाढीस लागली आहे. अडचणीच्या काळात सारासार विचार न करता अगदी मूर्खपणाने कुणालाही शरण जात पायावर मस्तक ठेवून नमस्कार करणे आणि चमत्काराची अपेक्षा करून त्यांना न्याय मागणे खरेच योग्य आहे का हो ? आपले मस्तक कुणाच्या पायावर ठेवताना त्या माणसाची पात्रता काय ह्याचा थोडाही विचार न करणे मूर्खपणा होय , कारण की 
जब तक न जानो शील ,
  तब तक न झुकावे शीर! 
    अंदर से दरींदगी और वासनाकी झील,
             बाहर से तो हर कोई जिंदादील!!
    आपण कुणाला शरण जात आहोत आणि पाया पडून मान सन्मान देत आहोत याचा विचार केला पाहिजे जरूर. स्वतःचा संघर्ष स्वतः करायचा आणि मग देवाचा आशीर्वाद मागायला प्रार्थना करायची ! 
शेवटी काय हो ,                                           अधांतरी विश्वाचाही संसार पोरका
ज्याने रचियेला त्याला देई आर्त हाका

तोच बुडवितो तोच तारूनी नेणार
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
जो तो आपापला येथे कुणी ना आधार ! 

श्री.व्ही.व्ही.कुलकर्णी,पंढरपूर.
मोबा. 9767473727,
         9768473727.

Post a Comment

0 Comments