LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीत ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ निमित्त येत्या शनिवारी ‘तांत्रिक परिसंवादा’चे आयोजनज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे यांची माहिती



पंढरपूर- ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ निमित्त ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, पंढरपूर यांच्या वतीने शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग(ऑटोनॉमस) मध्ये ‘तांत्रिक परिसंवादा’चे तसेच ‘स्व. डॉ. सुहास देशपांडे जीवन गौरव पुरस्कार’ व ‘स्व. डॉ. चंद्रकांत निंबाळकर उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार’ या उपक्रमांचे आयोजन केले आहे.’ अशी माहिती पंढरपुरातील ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे यांनी दिली.
       या कार्यक्रमाअंतर्गत सकाळी ९ ते ९.३० नोंदणी, अल्पोपहार आणि चहा हा कार्यक्रम तर त्यानंतर सकाळी ९.३० वाजता पुणे विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धनचे सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर यांच्या अध्यक्षतेखाली श्री व. च. कामधेनु विश्व विद्यालय दुर्ग चे माजी कुलगुरू प्रा. डॉ. एन.पी. दक्षिणकर यांचे ‘अँटीमायक्रो बॅक्टेरियल रजिस्टन्स अँड इट्स रॅशनल अप्रोच’ या विषयावर तसेच सकाळी १०.३० वा परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. नितिन मार्कंडे यांचे पशुवैद्यकीय क्षेत्रापुढील आव्हाने: काल, आज आणि उद्या’ या विषयावर ‘तांत्रिक परिसंवादाचा’ कार्यक्रम होणार आहे. यावेळी पुणे पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. समीर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे व स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या शुभहस्ते ‘स्व. डॉ. सुहास देशपांडे जीवन गौरव पुरस्कार’ व ‘स्व. डॉ. चंद्रकांत निंबाळकर उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार’ वितरीत केले जाणार आहेत. यावेळी जीवन गौरव पुरस्कारार्थी प्रा. डॉ. नितीन मार्कंडे व डॉ. संतोष पंचपोर तसेच पशुसंवर्धन पुणे विभागचे माजी सहआयुक्त डॉ.अंकुश परिहार, सातारा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, पशुसंवर्धन विभाग कोल्हापूरचे उपायुक्त डॉ. प्रमोद बाबर, सांगलीचे उपायुक्त डॉ. अजय थोरे, सोलापूरचे उपायुक्त डॉ. अनिल तांबे, सांगलीचे सहआयुक्त डॉ.विजय डोके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे, सचिव डॉ. अनिल सरदेशमुख व मार्गदर्शक डॉ. टी.एन. बेले, डॉ. राज सावळकर, डॉ. प्रवीण जाधव, डॉ. तानाजी भोसले, शिवराजे पवार यांच्यासह पशुवैद्यक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील सर्व पशुधन विकास अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यासाठी महाव्हेटचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ.विजय कोळेकर, पशुसंवर्धन पंढरपुरचे सहा.आयुक्त डॉ. संजय हिंगमिरे, पशुसंवर्धन सहा.आयुक्त डॉ. तानाजी खांडेकर आदी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

Post a Comment

0 Comments