पंढरपूर-वाखरी :- प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. अर्जुनराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वाखरी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवीन शाखांचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. युवक मराठा महासंघाच्या तीन शाखा- शिव प्रतिष्ठान वाखरी, संभाजी नगर वाखरी, छत्रपती ग्रुप, शिंदे मळा वाखरी आणि विद्यार्थी आघाडी मराठा महासंघ कै. आमदार अण्णासाहेब पाटील चौक वाखरी येथे एक शाखा अशा एकूण चार नवीन शाखा करण्यात आल्या. यावेळेस आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष मा. श्री. अर्जुनराव चव्हाण यांनी सांगितले की, गावातील तरुणांनी वाईट मार्गाच्या पाठीमागे न लागता आपला शेतीला जोड व्यवसाय म्हणून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून नवीन उद्योग सुरू करावेत. तसेच स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहायचे असेल तर आपला समाज ही त्यासोबत पुढे गेला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपला समाज उद्योजक कसा बनेल, तरुणांच्या हाताला काम कसे मिळेल, याकडे लक्ष द्यावे. आपला स्वतःचा विकास झाला तरच समाजाचा विकास होईल. तसेच बँक प्रकरणांमध्ये तरुणांना अडचणी येत असतील तर त्याही निश्चितपणाने सोडवल्या जातील. असे आव्हान केले. तसेच यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी आघाडी जिल्हा संघटक म्हणून पै. चरण बबन साळुंखे आणि विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष म्हणून श्रीशांत धुमाळ यांची निवड ही करण्यात आली. या कार्यक्रमा वेळी प्रमुख उपस्थिती, नूतन पंचायत समिती सदस्य व गटनेते मा. श्री. निखिलगीर (नाना) गोसावी, रमेश (दादा) पोरे पै. धनाजी पांढरे शाळा समिती अध्यक्ष, महादेव मस्के, सिताराम गाजरे, हरिदास साळुंखे, बबन साळुंखे, नारायण शिंदे, डॉ. गणपत पोरे, सचिन गंगथडे, संतोष जाधव, शिवाजीराव मोरे, हनुमंत कदम, नानासाहेब शिंदे, रोहित (भैया) चव्हाण, सोमनाथ बागल, सचिन थिटे, दिलीप उघाडे, बाळासाहेब लेंगरे, कीर्तीकुमार गायकवाड, दादा धनवडे, राजू कोळी (सर), अतुल शिंदे, रामदास पोरे, तुकाराम जगदाळे दत्तात्रेय (आण्णा) पोरे, विजय साळुंखे नूतन शाखा पदाधिकारी:- बबलू देवकर, श्रीयश पोरे, संकेत पोरे, प्रशांत बेडके, अर्जुन पोरे, समाधान जगताप, लखन शिंदे, रणजीत शिंदे, राहुल शिंदे, मंगेश शिंदे, विजय पवार, योगेश पोरे, अभिजीत शिंदे, पै.ऋषिकेश गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, नागेश कदम, विशाल भाकरे, संतोष पवार, प्रथमेश पोरे, जीवन साळुंखे, सचिन शिंदे, किरण साळुंखे, रोहन सुरवसे, सुमित गाजरे इ. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments