यात हकीकत अशी की, मौजे अंजनगांव, ता. माढा येथील अंजनगांव येथील खेलोबा मंदीर जागेसंबंधी छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा या जागेसंबंधी वाद निर्माण झाला होता व मोजणी प्रकरणी वादावाद होवुन मोजणी अधिकारी यांनी लक्ष्मण हाके यांचे विरूद्ध माढा पोलीस स्टेशन अंतर्गत गु.र.नं. १००/२०२६ बेकायदेशीर जमाव सरकारी कामात अडथळा म्हणुन १११(२), १८९ (२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), १३२ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर प्रकरणामध्ये ६० ते ७० लोकांना आरोपी करण्यात आले होते या प्रकरणी लक्ष्मण हाके यांनी सदर प्रकरणासंबंधी लक्ष्मण हाके यांनी बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब यांचे न्यायालयात श्री. व्ही. के. मांडे यांचे न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता या प्रकरणी माढा पोलीस व सरकारी पक्षाचे व अर्जदार यांचे म्हणणे व युक्तीवाद ऐकुन घेवुन प्रस्तुत प्रकरणामध्ये लक्ष्मण हाके यांनी अटकेची कोणतीही आवश्यकता नाही असा युक्तीवाद लक्ष्मण हाके यांचे वकिल यांनी केला व सदरची बाब न्यायालयाने ग्राह्य धरून लक्ष्मण हाके यांचा प्रस्तुत गुन्ह्यामध्ये अटकपुर्व जामीन मंजूर केला.
यात अर्जदार लक्ष्मण हाके तर्फे **ॲड. यासीन अजीज शेख, ॲड. अब्दुल करीम लांडगे, ॲड. शाहीद बाबुलाल शेख, ॲड. झिशान साहेबलाल शेख, ॲड. गौतम भालेराव, ॲड. अकलाक शेख, ॲड. विजय खडतरे**, यांनी काम पाहिले.

0 Comments