दिनांक 26 मे च्या रात्री पहाटे दोन वाजताच्या सुमारास तुंगत गावातील श्री विशाल भोसले यांचे दहा चाकी ट्रक मधून एक जण ब्रीजा गाडीमध्ये डिझेलचे ड्रम ठेवून दुसरे दोन जण फायबरच्या पाईपच्या साह्याने ट्रक मधून डिझेल चोरी करून तीन ड्रम डिझेल चोरी केला त्यानंतर ट्रकचा मालक विशाल भोसले यास संशय आल्यानंतर ब्रिझा गाडीचा पाठलाग केला त्याच्यानंतर ती गाडी गुरसाळे बायपासला आल्यानंतर त्या ठिकाणी समाधान गुटाळ याचे हॉटेल समोर असलेल्या गाडीच्या बाजूला लावून त्या ठिकाणी देखील ब्रिजा गाडीमधून दोघेजण खाली उतरून एक जण प्लास्टिकची पाईप तेथील ट्रकच्या गाडीला लावून डिझेलचे टाकीतून डिझेल चोरी करत असताना आरडाओरडा केल्याने तिथून दोघे पळून गेले आणि एका व्यक्तीला लोकांनी पाठलाग करून पंढरपूर तालुका पोलिसांना याची माहिती दिली पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन चोरी केलेले डिझेल ब्रिजा कार व तीन मोबाईल फोन असा एकूण तीन ड्रम डिझेल सह मुद्देमाल एकूण किंमत रुपये आठ लाख 35000 चा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतलेला असून आरोपी दत्तात्रय महारुद्र लोहार राहणार मोहोळ तालुका मोहोळ याचे विरुद्ध व त्याचे इतर दोन साथीदार याचे विरुद्ध बी एम एस ऍक्ट कलम 303 प्रमाणे डिझेल चोरीचा गुन्हा दाखल केलेला असून आरोपी दत्तात्रय महारुद्र लोहार या सदर चोरीच्यातपास कामी ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतर पळून गेलेल्या दोन आरोपींचा पंढरपूर तालुका पोलीस मोहोळ भागात शोध घेत आहेत मागील दोन महिन्यात तुंगत गुरसाळे रोडवर डिझेल चोरीच्या अनेक घटना घडलेल्या होत्या त्या बाबतीमध्ये सदर कारवाईतून आणखीन डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे शहाजी गोसावी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे भारत भोसले दत्तात्रय तोंडले ASI विजू गायकवाड पोलीस हवालदार जाडकर नितीन चौरे सुजित उबाळे पोलीस हवालदार साळुंखे संजय गुटाळ मंगेश रोकडे पोलीस हवालदार योगीराज खिलारे सुहास देशमुख दीपक भोसले अभिमन्यू गरड यांच्या पथकाने केली आहे

0 Comments