LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यामुळे त्यांना भविष्यातील करिअरसाठी प्रेरणा मिळते : डॉ.बी.पी.रोंगे



मंगळवेढा (प्रतिनिधी) : जे विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये यश संपादन करतात अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यामुळे त्यांना भविष्यातील करिअर साठी योग्य ते प्रेरणा मिळण्यास मदत होते असे प्रतिपादन स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज गोपाळपूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.ते काल मंगळवेढा येथील महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते.
   यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खा.प्रणिती शिंदे, ॲड.भारत पवार, संजय कट्टे, यशदा पुणेचे प्रा.महादेव माळी, डॉ.पुष्पा भोसले, माजी केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे, संस्थेचे अध्यक्ष ॲड.दत्तात्रय खडतरे, सचिव कविता खडतरे, मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे, नंदकुमार व्हरे, शिवाजी कांबळे, लक्ष्मण गळवे, संभाजी सलगर, अर्चना सलगर, सचिन कोळेकर, भारत रायबान, अंजली जोशी, बोराळेचे माजी सरपंच कुमार धनवे, उज्वला शिंदे, आशाबाई खडतरे, रोहिदास सपताळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी डॉ.बी.पी.रोंगे यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दहावी-बारावीच्या परीक्षेतील यशानंतर करिअर साठी काय करावे याबाबतीत मार्गदर्शन केले.समाजात वेगवेगळ्या प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम घेवून सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमिका संस्थेच्या माध्यमातून पार पाडत असून जे विद्यार्थी ग्रामीण भागातून पुढे येत आहेत.ते नक्कीच हुशार असतात त्यांना योग्य त्या मार्गदर्शनाची गरज असते.त्याचबरोबर त्यांनी यश संपादन केल्यानंतर त्यांचा गौरव होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचे काम या मंगळवेढा तालुक्यात ॲड.दत्तात्रय खडतरे हे करत असल्याचे त्यांनी सांगितले.
  यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनीही दहावी-बारावीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या ॲड.दत्तात्रय खडतरे यांचेही अभिनंदन केले. दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून पुढील संपूर्ण जीवनाची दिशा या टप्प्यावर ठरत असते.पूर्वी विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान असे मर्यादित पर्याय उपलब्ध होते, मात्र आज बदलत्या काळात विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य दिशा निवडून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.आज सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन केले असून हा सन्मान त्यांच्या मेहनतीची पावती असल्याचेही त्यांनी सांगितले.
   यावेळी ॲड.दत्तात्रय खडतरे यांनी जर एखाद्या परीक्षेत विद्यार्थ्याला अपयश आल्यास त्यांनी खचून न जाता परत जोमाने तयारी करून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी कधीच मागे पडणार नाहीत.असे त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
    याप्रसंगी प्रा.महादेव माळी, प्रा.भालचंद्र कांबळे, डॉ.पुष्पा भोसले, संस्कार गवळी, समृद्धी सपताळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
   हा कार्यक्रम यशस्वीरित्या ज्ञानेश्वर भंडगे, विलास गवळी, दत्तात्रय डांगे, नाथाजी कांबळे, अश्विनी गवळी, संकेत माने, तेजस झेंडे, सोहम खडतरे, आत्माराम गवळी, अनिता कांबळे, सुभाष कांबळे, डॉ.नंदकुमार  शिंदे, भगवान कांबळे, संजय खडतरे, सिध्दनाथ कांबळे, रामा सपताळे, लिंगाण्णा पाटील, भारत रायबान, मोहन शिंदे, मधुकर भंडगे, संभाजी गवळी, सुजित सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments