👉 *“निराकार तू निर्गुण ईश्वर… तरी माझ्यासाठी साकार होऊन विटेवर उभा आहेस…”*
वारकरी संप्रदायाची अखंड भक्तीपरंपरा, संतांचा विचार आणि “भक्ती, समता व मानवता” यांचा संदेश देणारे श्रीक्षेत्र पंढरपूर हे संपूर्ण महाराष्ट्राच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. अधिक मासानिमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण, “विठ्ठल-विठ्ठल” नामाचा अखंड गजर आणि अध्यात्मिक ऊर्जा अनुभवताना मन समाधानाने व शांततेने भरून गेले. श्री विठुरायाचे मनमोहक रूप मनाला प्रसन्नता देणारे असल्याची भावना खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी चंद्रभागा नदीतील भक्त पुंडलिक दर्शन, नामदेव पायरी दर्शन तसेच संत चोखा मेळा समाधी स्थळास भेट देऊन दर्शन घेतले.
वारकरी परंपरेतील संतांच्या विचारांना अभिवादन करत समाजात समता, मानवता आणि सेवाभाव अधिक दृढ व्हावा, जनसेवेचे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी बळ मिळावे, तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख, समृद्धी, भरभराट आणि उत्तम आरोग्यासाठीही प्रार्थना व्यक्त करण्यात आली.
अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती व प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहितीही खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली.
यावेळी तालुका अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, किरण घाडगे, आदित्य फत्तेपूरकर, संदीप शिंदे, व्यंकटेश कुलकर्णी, सादिक मुलाणी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments