LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑*खासदार प्रणिती शिंदे यांचा पडसाळी व वांगी गावांचा दौरा; ग्रामस्थांच्या प्रश्नांवर तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन*



सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्याअंतर्गत पडसाळी व वांगी या गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

पडसाळी गावात सोयाबीन पीक विमा तसेच शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी गावात लवकर सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर मागणी मांडली. 
यावेळी त्यांनी जागेवरूनच शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून कामातील विलंबाबाबत जाब विचारला. तसेच पडसाळी गावातील एसटी बसचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगत गावात एमपीएससी - यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका उभारून देण्याचे आश्वासनही दिले.

त्यानंतर वांगी गावात झालेल्या बैठकीत गावाला जोडणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती, वांगी-कळमण पुलाची उंची वाढविणे तसेच अतिरिक्त डेपोच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी लक्ष वेधले. 

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी गावातील सर्व प्रलंबित मागण्या आणि विकासकामे लवकर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

दौऱ्यादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना आणि विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या. गावांमध्ये प्रलंबित असलेली विकासकामे अधिक गतीने आणि परिणामकारकपणे पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, सचिन गुंड, कृष्णात पाटील, अंबादास पाटील, विलास पाटील, बापूसाहेब बंडगर, चांगदेव गवळी, यल्लप्पा पवार, आप्पासाहेब वडणे, ज्योतिराम पाटील, सतीश भोसले, अमर शेख, रामचंद्र शिरसाट, अमर भोसले, ज्ञानेश्वर भोसले, संदीप सुरवसे, शुभम शिराळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments