LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बेकायदा १७ बंदुकीसह आरोपीला घातल्या बेड्या

बडवाणी राज्य मध्यप्रदेश येथुन बेकायदेशीररित्या पिस्टल विक्रीसाठी आणुन ते अकोले ता. माढा, करकंब ता. पंढरपुर, चिक महुद ता. सांगोला, मिरज जि. सांगली तसेच इतर गावातील इसमांना विक्री केले जात असल्याचे समोर आले आहे.  आरोपीकडे अधिक चौकशी केली असता सदर पिस्टल (अग्निशस्त्रे) व जीवंत काडतूस विक्री केलेल्या इसमांची माहिती समोर आली आहे. यापैकी विकास कैलास वजाळे याने


 १) शनि भारत बनसोडे रा अकोले खु ता माढा जि सोलापूर यास ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे, 
२) महादेव बाळासाहेब कोरके रा कोरकेवस्ती करकंब ता पंढरपुर यास यांना ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे,

 ३) प्रदिप पांडुरंग माने रा चिकमहुद ता सांगोला यास ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे,

 ४) विजय सदाशिव किरणगी रा. शिवपुर ता. आटणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक यांस ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे,

 ५) सुमित नाना लवटे रा. भुईटे वस्ती, सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर यास ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे विक्री केल्याचे सांगितले

त्याप्रमाणे आरोपी महादेव बाळासाहेब कोरके रा कोरकेवस्ती करकंब ता पंढरपुर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहे. आरोपी विजय सदाशिव किरणगी रा. शिवणुर ता. आटणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. तसेच प्रदिप पांडुरंग माने रा चिकमहुद ता सांगोला याचे घराची घरझडती घेवुन त्याचे घरातुन ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आलेली आहेत तसेच शनी भारत बनसोडे रा अकोले खु ता माढा याचे घराची घरझडती घेवुन त्याचे घरातुन ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आलेली आहेत.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये अटक आरोपी विकास कैलास वजाळे याने गुन्हयातील अग्निशस्त्रे सोनगीर ता.जि धुळे येथे इसम नामे अनिल पंचलाल मेहता रा राजंणगाव ता वरला जि बडवाणी राज्य मध्यप्रदेश हा दिनांक १६/०८/२०२६ रोजी सोनगिर जि धुळे येथे अग्निशस्त्र देण्यास येणार असलेबाबत माहिती सांगुन त्याचे वर्णन व त्याचा फोटो दाखविला. त्याप्रमाणे दि. १५/०८/२०२६ रोजी  सोलापूर  ग्रामीणचे  पोलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीरज  उबाळे अकलूज  व अकलुज पोलीस ठाणेकडील सपोनि/अंकुश वाघमोडे, पोहेकॉ/१५८९ शिवकुमार मदभावी, पोहेकॉ / २११ राहुल रणनवरे, पोहेकॉ/१६५९ अनिल शिंदे, पोहेकॉ/११४ स्वप्नील गायकवाड, पोकॉ/५१ रणजित जगताप यांचे पथक तयार करुन ते सोनगीर ता. जि. धुळे येथे जावुन आरोपी विकास वजाळे याने दिलेल्या वरील माहिती प्रमाणे व वर्णनाप्रमाणे एक इसम हा हातामध्ये एक पिशवी घेवुन सोनगीर, धुळे येथील एका बंद हॉटेल समोर संशयितरित्या रोडवर फिरताना मिळुन आला. त्याला शिताफीने ताब्यात घेवुन त्याचेकडील एकुण ०४ अग्निशस्त्रे व २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
 सदर पथक परत अकलुज पोलीस ठाणेस येत असताना उपरोक्त गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे राहूल राहूल सतिश माने रा. मिरज जि. सांगली हा टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर परिसरात असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाल्याने सपोनि/अंकुश वाघमोडे व स्टाफ असे सदर ठिकाणी जावुन शोध घेतला असता सोबतचा इसम नामें आरोपी अनिल पंचलाल मेहता याचे मदतीने राहुल सतिश माने रा वसंत दादा हौंसीग सोसायटी, माजी सैनिक वसाहत, मिरज ता मिरज जि सांगली यास ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामें राहुल सतिश माने हा उमदी पोलीस ठाणे जि. सांगली गु र नं १३८/२०२६ बी.एन.एस १०३, ३(५) सह भा. ह. अधि ३, २५ प्रमाणे दाखल गुन्हयात फरार आरोपी आहे.
त्याचप्रमाणे सदर गुन्हयाचे तपासामध्ये अटक आरोपी नामे विकास कैलास वजाळे वय ३१ वर्षे रा. परीते ता. माढा जि. सोलापूर याचेकडे तपास केला असता त्यांनी सांगोला ता. सांगोला सुमित नाना लवटे रा. भुईटे वस्ती, सांगोला यांना ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे विक्री केले असल्याचे सांगितले. सपोनि/विक्रम साळुंखे यांनी सुमित नाना लवटे यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन ०१ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०२ जीवंत काडतूसे जप्त करण्यात आले आहे. तसेच अटक आरोपी राहुल सतीश माने रा वसंतदादा हौसींग सोसायटी, माजी सैनिक वसाहत मिरज ता मिरज जि सांगली याचेकडे तपास केला असता त्यांने निवेदन पंचनाम्याने ०६ पिस्टल (अग्निशस्त्रे) व ०८ जीवंत काडतूसे काढुन दिल्याने जप्त करण्यात आले आहे.
सदर अटक आरोपी यांचेकडे कोणत्याही प्रकारचा पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याचा परवाना नसलेबाबत निदर्शनास आलेले आहे. सदर गुन्हयात आरोपी नामे १) विकास कैलास वजाळे वय ३१ वर्षे रा. परीते ता. माढा जि. सोलापूर, २) राहुल सतिश माने वय ३४ वर्षे रा. वसंतदादा हौंसिंग सोसायटी, माजी सैनिक वसाहत, मिरज ता. मिरज जि. सांगली ३) महादेव बाळासाहेब कोरके वय ३० वर्षे रा. कोरके वस्ती, करकंब ता. पंढरपुर जि. सोलापूर ४) विजय सदाशिव किरणगी वय ३४ वर्षे रा. शिवणुर ता. आटणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक ५) अनिल पंचलाल मेहता वय ३२ वर्षे रा. रांजणगाव ता. वरला जि. बडवानी राज्य मध्यप्रदेश ६) सुमित नाना लवटे वय १९ वर्षे रा. भुईटे वस्ती, सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर यांना अटक करण्यात आलेली असुन मा. न्यायालयाने त्यांना दि. २१/०८/२०२६ रोजी पर्यत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे. आरोपी नामे १) प्रदिप पांडुरंग माने रा. चिक महुद ता. सांगोला जि. सोलापूर, २) शनि भारत बनसोडे रा. अकोले खुर्द ता. माढा जि. सोलापूर हे सध्या फरारी आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास विक्रम सांळुखे सहा पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस ठाणे हे करीत आहेत.

जिल्हयात अवैध अग्निशस्त्रे, शस्त्रे, शरिराविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची सदरची मोहिम चालु ठेवण्यात येणार आहे.
(अतुल कुलकर्णी)
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

Post a Comment

0 Comments