LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूरचे सुपुत्र विक्रम नाईकनवरे २४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त



पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूरचे सुपुत्र विक्रम राजाराम नाईकनवरे यांनी भारतीय सैन्य दलात तब्बल २४ वर्षे ३० दिवसांची प्रदीर्घ व निष्ठावंत सेवा बजावल्यानंतर नुकतीच सेवा निवृत्ती घेतली. २ ऑगस्ट २००२ रोजी भारतीय सैन्य दलातील कोअर ऑफ सिग्नलमध्ये दाखल झालेल्या नाईकनवरे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.

सेवानिवृत्तीनंतर भावना व्यक्त करताना त्यांनी “आई-वडिलांची प्रेरणा आणि आजीच्या आशीर्वादाने आपण हे कर्तव्य पार पाडू शकलो,” असे सांगितले.

प्रदीर्घ सेवाकाळातील उल्लेखनीय योगदान

पंजाब येथे अन्न पुरवठा निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

ड्रिल इन्स्ट्रक्टर व डब्ल्यूटी उस्ताद म्हणून काम केले.

हिमाचल प्रदेशमध्ये आर.एच.एम., गोवा येथे सी.एच.एम. आणि पंजाबमध्ये सी.क्यू.एम. अशा विविध पदांवर सेवा बजावली.

नव्याने भरती झालेल्या रिक्रूट व अधिकाऱ्यांना तसेच ज्युनिअर लीडर ऑफिसर्सना प्रशिक्षण देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

सेवा बजावत असतानाच पदविधीपर्यंतचे (ग्रॅज्युएशन) शिक्षण पूर्ण केले.

सैन्य सेवेदरम्यान विविध ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावली.


देशसेवेची २४ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द पूर्ण करून स्वगृही परतलेल्या विक्रम नाईकनवरे यांच्या योगदानाबद्दल पंढरपूर परिसरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

जय हिंद! जय भारत! 🇮🇳

Post a Comment

0 Comments