पंढरपूर : बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ऊस बिलाचा दुसरा हप्ता तातडीने मिळावा, या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समिती व ऊस उत्पादकांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करूनही अनेक कारखान्यांकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही. बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण असून, या काळात जनावरांची पूजा, सजावट तसेच विविध सणासुदीच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता असते.
त्यामुळे तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचा दुसरा हप्ता तातडीने अदा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सणाच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात पैसे उपलब्ध झाल्यास त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांनी संबंधित साखर कारखाना प्रशासनाशी संपर्क साधून ऊस बिलाचा दुसरा हप्ता लवकरात लवकर मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी ऊस दर संघर्ष समिती केली.
बैलपोळ्यापूर्वी ऊस बिलाचा दुसरा हप्ता मिळावा, अन्यथा पंढरपूर तहसील कार्यालय समोर बोंबाबोंब आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे समाधान फाटे, सचिन पाटील, माऊली जवळेकर, निवास नागणे, अनिल बागल, विनोद बागल इतर उपस्थित होते...

0 Comments