मौजे कोळेगाव
कोळेगाव येथे आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विश्वकर्मा प्रधानमंत्री साहित्य योजने अंतर्गत लाभार्थी श्री दत्ता गेजगे व श्री नारायण पारसे यांना मिळालेल्या साहित्याचे पूजन सहकार महर्षी शंकरा मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना संलग्न शिवसृष्टी मल्टीमीडिया लेजर शो चे संचालक धनंजय भाऊ दुपडे व सरपंच श्री अँड धनंजय दुपडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी योजनेचा लाभ घेतलेले सदस्य श्री दत्ता गेजगे यांनी गावातील सर्व लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले. या योजनेसाठी लागणारी प्रशिक्षण, कागदपत्र, ऑनलाइन फॉर्म, याविषयी सर्व माहिती दत्ता गेजगे यांना विचारून सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा फॉर्म भरावा असे मा सरपंच प्रसाद दुपडे यांनी समोरील जनसमुदाय सांगितले.
या वेळी या कार्यक्रमास अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री नितीन सावंत तसेच कोळेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक श्री उत्तरेश्वर पारसे, मा सरपंच अनिल बेंदगुडे, मा तंटामुक्ती समीती अध्यक्ष आनंदराव जाधव, तसेच गणेश निंबाळकर, प्रवीण सावंत, पंकज दुपडे सर, विजय दुपडे, विजय चव्हाण गणेश माने, तसेच गावातील आजी-माजी संस्थांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते

0 Comments