LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा मार्च पूर्वी सुरु करा, आमदार आवताडे यांच्या आढावा बैठकीत सूचना



प्रतिनिधी 

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामास गती देण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी योजनेची संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन योजनेतील अडथळे जाणून घेतले यावेळी पहिल्या टप्प्यामधील पंप हाऊस, मेन रायझिंग आणि वितरिकाची अपूर्ण कामे  तात्काळ पूर्ण करा,दुसऱ्या टप्प्याचे पंप हाऊस, मेन रायझिंगचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन करून मार्च 2027 च्या अगोदर दुसऱ्या टप्प्यापर्यंत पाणी निघायला हवे असे माझे नियोजन असून त्या पद्धतीने दिवसावर नियोजन करून जलद गतीने काम करा अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
 या बैठकीला अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता मुन्नोळी, डेप्युटी इंजिनीयर दुधाळ,जि. प. सदस्य प्रदीप खांडेकर,करुणा शिवशरण,जनार्दन शिवशरण,उपनगराध्यक्ष येताळा भगत,बाळासाहेब ताड, अंकुश पडवळे उपस्थित होते.
 यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले की,गुंजेगाव येथील हाऊसच्या कामातील अडथळ्याबाबत मा.जिल्हाधिकारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना सूचना दिल्या त्यांच्याकडून ही तात्काळ कार्यवाही करून अडथळे दूर करा
पहिल्या टप्प्यातील 111 कोटीची कामे असून यामध्ये पंप हाऊस बांधकाम करणे,उर्ध्वगामी नलिका क्रमांक एकचे काम सुरू करणे, शेलेवाडी येथे वितरण कुंड तयार करणे ही कामे आहेत तर दुसऱ्या टप्प्यात 78 कोटी 43 लाखाची कामे असून यामध्ये पंपगृह टप्पा दोन,संरक्षक भिंत, बॅलन्सिंग टॅंक, उर्ध्वगामी नलिका दोन लेंडवे चिंचाळे, मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम, तसेच योजना कार्यान्वितीकरण करणे, पाच वर्षे परिचलन,देखभाल व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासह सर्व वितरण व्यवस्थेचे पाणी वापर संस्था स्थापन करून सर्व वितरण व्यवस्था हस्तांतरण करणे या बाबी दुसऱ्या टप्प्यातील कामात होणार आहेत अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत त्याचबरोबर
तिसरे टप्प्यातील कामाचे टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर करून घेण्याच्या सूचना दिल्या तिसऱ्या टप्प्यातील काही ठिकाणी हस्तांतरणाच्या बाबी अपूर्ण असून मोजणी तात्काळ करून देणे बाबत ही जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना या बैठकीतून सूचना दिल्या असून यंदाच्या उन्हाळ्यात योजना कार्यान्वित करून पहिल्या दुसऱ्या टप्प्याचे पाणी सुरू करणार असल्याचेही सांगितले

Post a Comment

0 Comments