LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नवरात्रोत्सवानिमित्त श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकारांचा साज





पंढरपूर, दि. २१ : घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक पोषाखासह विविध अलंकार परिधान करण्यात आले आहेत. दरवर्षीच्या प्रथा-परंपरेनुसार मातेचा साजशृंगार करण्यात आला असून, अलंकारांनी सजलेले मातेचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री रुक्मिणी मातेला सुवर्ण मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, जवमणी पदक, चिंचपेटी, जवेच्या माळा, पुतळ्यांची माळ, मोहराची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा, मच्छ जोड, कर्णफुले, मण्या-मोत्यांच्या पाटल्या, पैंजण जोड आणि नथ आदी पारंपरिक अलंकारांनी सजविण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवात श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून, या काळात मंदिरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. पारंपरिक पोषाख आणि अलंकारांनी सजलेल्या मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

याबाबतची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.

Post a Comment

0 Comments