मंगळवेढा(प्रतिनिधी)ः अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक मंगळवार दि.15 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वा. किल्ला भागातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा आण्णासाहेब पाटील मागास विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी सचिन ज्ञानेश्वर डोरले,तर शहराध्यक्षपदी आण्णासाहेब विठोबा आसबे तसेच युवक शहराध्यक्षपदी आण्णा राजेंद्र ओमने यंाची निवड झाल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी जाहिर केली.
यावेळी शिवाजीराव वाकडे,सुरेश कट्टे,लहू ढगे,हरीप्रसाद देवकर,ज्ञानेश्वर भगरे,विराज आवताडे,सतीश दत्तू,संदिप फडतरे,ज्ञानेश्वर कोंडुभैरी,निवृत्ती कदम,रवी जाधव,गणेश ओमने,आनंद मुढे,प्रदिप पडवळे,जयदीप जाधव,गणेश ओमने,दत्ता सावंजी यांचेसह मराठा समाजातील युवक,ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.



0 Comments