दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारत निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला एक अप्रतिम अशी गोष्ट सुपूर्द केली ती म्हणजे भारतीय संविधान, होय तेच संविधान ज्यावर आज जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश चालतोय, या लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ च नव्हे तर या लोकशाहीचा आत्मा आहे भारतीय संविधान. आज या देशातील सर्वात मोठ्या उत्सवात सामील होऊया आणि भारत देशाच्या, सर्वात मोठ्या उत्सवात सामील होऊया, संविधान दिन साजरा करुया.आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करुयात आणि हा भारत देश एक राष्ट्र घडवूया. राष्ट्रविरोधी असणाऱ्या जाती आणि जातीव्यवस्था यांचे निर्मूलन करून हा एकसंघ भारत देश घडवूया. संविधान दिनी संविधानाचा गौरव करूया. हर एक चाळी, मोहल्ला, नगर, कॉलनी, गाव, तालुका, जिल्हा, शहर अगदीच गल्ली ते दिल्ली लहान मोठे सर्वांनी मिळून जगातील सर्वश्रेष्ठ असणाऱ्या संविधानाचा जागर करूया. मोठ्या प्रमाणात संविधान दिन साजरा करूया. लोकशाहीचा हा सर्वात मोठा महोत्सव साजरा करूया, प्रथम भारतीय आणि अंतिमता ही भारतीय ही भावना राष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात रुजवूया.
भारतीय संविधान भारताला समर्पण केलेल्या या महान अशा संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना मंगलमय सदिच्छा.
आजचा हा संविधान दिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने पंढरपूर शहर व तालुक्यातिल पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी विश्वरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान पठण करून आदरांजली अर्पण करण्यात आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, शिवसेना शहर सचिव कैलास लोकरे, शहर कार्याध्यक्ष अनिल कसबे, शिवसेना शाखा प्रमुख प्रणित आण्णा पवार, श्रीनिवास उपळकर, शाखा प्रमुख पिंटू रेड्डी, पिंटू पवार, फडतरे सर तसेच वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.आजचा हा संविधान दिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने पंढरपूर शहर व तालुक्यातिल पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी विश्वरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान पठण करून आदरांजली अर्पण करण्यात आहे.
भारतीय संविधान चिरायू होवो.
0 Comments