LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर येथील युवकाची अनोखी विठ्ठल भक्ती...

 

पंढरपुरच्या मंदिरास दिल्या भाविकांच्या उपयोगी वस्तु दान...



पंढरपूर (प्रतिनिधी)

वर्ण अभिमान विसरली यानी एकमेकालोटांगणी जाती असे संत वचन भागवत धर्मात रुढ आहे.वारकऱ्यांमध्ये जातपात धर्म कशाचेही बंधन नाही.या संतवचनाचे तंतोतंत पालन करणारे काही लोक समाजात आहेत.जाती धर्माच्या भिंती ओलांडून समाजाच्या हिताचे काम करण्याचे एक उत्तम उदाहरण पंढरपूरच्या मुस्लिम युवकाने केले आहे. समाजसेवक मुजम्मील कमलीवाले हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिरात येणार्या भावीकांना उपयोगी पडेल असे उपक्रम राबवतात या वर्षी वाढदिवसाच्या औचित्याने समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येणार्या व्रद्ध व अपंग भावीकांना दर्शनाला जाणे सोईस्कर व्हावे यासाठी  दोन वाॅकर,डायबेटिस पेन्शट ला शुगर चेक करण्याचे ग्लुकोमीटर, डिजीटल वजन काटा आणी औषधांचे किट हि सर्व साहित्य त्यांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी बुदलवाड यांच्या कडे सुपुर्द केल्या.

समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी यापूर्वी आपल्या वाढदिवसानिमित्त मंदीराला बी पी तपासणी मशीन,प्रथमउपचार पेटी,स्ट्रेचर व हिरकनी कक्ष भेट दिली आहे. मागे कोव्हीड चा कालावधी वगळता मुस्लीम युवक समाजसेवक मुजमील कमलीवाले हे दरवर्षी वाढदिवसा अनावश्यक खर्च टाळुन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी भाविकांच्या उपयोगी वस्तु देतात.त्यांचा हा उपक्रम समाजात आदर्श घालुन देणारा आहे त्यामुळे त्यांचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments