LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बीडचे जिल्हाधिकारी दिपा मुघोळ मुंडे आणि पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली करा: वसंत मुंडे

 



संभाजी पुरीगोसावी (बीड जिल्हा) प्रतिनिधी. महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणूक ही संदर्भात आचारसंहिता लागू झाले आहे. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपा मुघोळ मुंडे या पदावर कार्यरत असून त्यांचे सासर कन्हेरवाडी  ता.परळी जि.बीड मतदार संघातील असून देशांमध्ये लोकसेभेच्या निवडणुका चालू झाल्या आहेत. बीड लोकसभा मतदार संघा अंतर्गत परळी विधानसभा मतदार संघात जिल्हाधिकारी दिपा मुघोळ मुंडे यांचे गाव आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात जिल्हाधिकारी पदावर काम पाहता येत नाही. आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. तसे आदेश आचारसंहिते संदर्भात मार्गदर्शन सूचना व राजपत्र निर्गमित केलेले आहेत. कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये बीडमध्ये मोठी दंगल होऊन प्रतिनिधींच्या घरावर देखील हल्ले झाले होते. बेकायदेशीरपणे अनेक ठिकाणी परवानगी नसता आंदोलने बॅनर बाजी चालू असून सर्व  नियमबाह्य कामे प्रशासनाला धरुन चालू आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील अकार्यक्षम अधिकारी आहेत.बीड संवेदनशील लोकसभा मतदार संघ असुन. दंगली झाली त्यावेळेस पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. बेकायदेशीरपणे नंबर-२ चे धंदे चालू आहेत. आचारसंहितेचा सर्व   स्तरांमध्ये बीड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक मार्फत कायद्यांचे उल्लंघन होत आहे. कायद्यांचे नियंत्रण नाही. सत्ताधाऱ्यांबरोबर त्यांचे लागेबांधे आहेत. निवडणुक ही अटीतरीची असुन कार्यक्षम अधिकारी असल्यामुळे त्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात. अशी मागणी होऊ लागली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments