संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाई पोलीस ठाण्याच्या वतीने वाई शहरांतून रुट मार्च काढण्यात आला. पुढील येणा-या रमजान ईद यासारखे सण उत्सव आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाई पोलिसांनी गुरुवारी शहरांतून सायंकाळी रूट मार्च काढला. या रूट मार्च मध्ये पोलीस अधिकारी वाहने जलद कृती दल यांचा समावेश होता. हा रुट मार्च पोलीस ठाण्यातपासून ते छ. शिवाजी चौक महागणपती चौक आमंत्रण चौक गणपती आळी धर्मपुरी रविवार पेठ किसनवीर चौक मोठ्या पुलावरून पुन्हा वाई पोलीस ठाण्यात समारोप करण्यात आला. आगामी सण उत्सव या काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबावित राखण्यासाठी वाई पोलिसांनी हा रुट मार्च काढला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली स्व:ता पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या नेतृत्वाखाली हा रुट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह आदीं कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.


0 Comments