LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

माहेरकडील प्रेम-प्रकरण सासरच्या मंडळींना समजेल म्हणून, जन्मदात्या आईनेच ६ वर्षींय मुलाचा गळा आवळला

 


 संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दिनांक २६ फेब्रुवारी रोजी माहेरकडील प्रेम संबंध सासरच्या मंडळींना समजेल म्हणून जन्मदात्या आईनेच सहा वर्षीय मुलाचा टीव्ही पाहत असताना गळा आवळला होता. त्यानंतर आईने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या तपासात आईनेच मुलाचा खून करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस झाले आहे. कौशल्या गणेश चोपडे असे आरोपी आईचे नाव आहे. तर प्रणव (वय ६ ) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. आजोबा नारायण चोपडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन सदर महिलेचे माहेरी असलेले प्रेम प्रकरण सासू-सासर्‍यांना कळते की काय? या भीतीने तिने हे कृत्य केले घटनेच्या दिवशी प्रथमत: तिने टीव्ही पाहतो काय? म्हणत लहान मुलाचा गळा आवळला नंतर तो मरण पावला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याला हलवून पाहिले परंतु आपण आत्महत्या केल्यानंतर मुलगा नाहीच मेला तर ?असा विचार करून तिने कुऱ्हाडीने त्याचे शिर धडावेगळे केले, त्यानंतर तिने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला त्यामुळे तणनाशक औषधाचे प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Post a Comment

0 Comments