अनुजा कारखेले ( सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे आणि चवण ऋषींच्या पावन झालेल्या भूमितील आदर्श माजी सरपंच म्हणून ओळखीत असणारे आणि कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले आदरणीय लालासो आप्पासो नेवसे यांचा रविवारी अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहांत संपन्न झाला, यावेळी करंजखोप चवणेश्वर पद्मानगर मोरबंदे रणदुलाबाद या गावासह उत्तर कोरेगांव परिसरांतील ग्रामस्थ मित्र मंडळ वयोवृद्ध तसेच माता बहिणी कुणी स्टेटस ठेवुन, तर कुणी समक्ष त्यांच्या निवासस्थानी भेट देवुन शुभेच्छा दिल्या, अतिशय मनमिळावू आणि शांत स्वभावाचे आणि नेहमीच सर्वांसाठी धावून येणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व असणारे आणि त्यांच्यासाठी शब्द मांडायचे झाले तर शब्द अपुरेच पडतील... असे त्यांचे व्यक्तिमत्व आजही करंजखोप ग्रामस्थांच्या नव्हे तर परिसरांतील जनतेच्या मनामनात अजमर आहे, उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप नगरीतील चवण ऋषींच्या पावन झालेल्या भूमीतील शेतकरी कुटुंबातील तसेच कुटुंबाला वारकरी संप्रदायाची परंपरा असलेले, त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात करंजखोप ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत मधील सर्वच माजी सदस्य आणि संपूर्ण गावातील ग्रामस्थांना सोबत घेवुन आपल्या कामाची एक वेगळीच छाप पाडली, प्रलंबित कामे तसेच गावांमधील समस्या रस्ते गटारे आणि गोर गरिबांच्या समस्या आणि अडचणी त्यांनी वेळोवेळी जाणून घेवुन गावातील राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध धार्मिंक कार्यक्रमांमध्ये देखील त्याचा सहभाग मोठा होता, काही कालावधीनंतर त्यात कोरोना रोगासारखा महामारी आली होती, कोरोनांच्या काळात ही नेहमीच गावातील ग्रामस्थांसाठी कार्यतत्पर राहिले होते, वेळोवेळी सूचना करून गावातील सर्वच ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते, श्री. नेवसे यांनी आपल्या पाच वर्षाचा कार्यकाळ हा चांगलाच गाजवला होतो, त्यामुळे त्यांचे नाव आजही करंजखोप गावातील ग्रामस्थांच्या मना-मनात कोरले गेले आहे, त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अनुषंगाने सर्वच स्तरांतून यामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिंक तसेच श्री. संत सावतामाळी ग्रुप त्यांचे सर्व सहकारी मित्रपरिवार आप्तेष्ट पै,पाहुवणे अशा विविध संस्थांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला, यावेळी श्री. लालसो नेवसे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले,
0 Comments