पंढरपुर: दि .14 ( प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे हे पंढरपूरला आज आषाढी एकादशीनिमित्तआढावा घेण्यासाठी आले असता चंद्रभागेच्या तिरी समस्त महादेव कोळी जमातीच्या वतीने त्यांना घेराव घालण्यात आला आहे. व मागण्याची निवेदन देण्यात आले आहे.
गेली अनेक वर्ष राज्याच्या 31 जिल्ह्यातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न आदिवासी विभाग आदिवासी मंत्री व 25 आमदार यांनी सुटू दिला नाही सातत्याने हे आदिवासी विभागाचे आमदार अन्यायग्रस्त आदिवासी महादेव कोळी जमाती वरती अन्याय करत असून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळू देत नाहीत .कोळी जमातीच्या प्रश्नासंदर्भात दिनांक 28 जून व 8 जुलै रोजी विधान भवन मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु आदिवासी आमदारांच्या दबावाला बळी पडून ती बैठक रद्द करण्यात आली असल्याने राज्याच्या 31 जिल्ह्यातील 45 ते50 लाख महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून कोणत्याही क्षणी उद्रेक होईल अशी परिस्थिती निर्माण .झाली आहे.
आमचा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवा अन्यथा आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ देणार नाही. असा इशारा महर्षि वाल्मीकी दिला होता. त्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांना महादेवकोळी जमात बांधवांच्या वतीने घेराव घालून घोषणाबाजी करण्यात आली आहे . दोन वेळा रद्द केलेले मीटिंग केव्हा घेणारा त्याचे ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे वआद्य क्रांतीकारक रागोजी भांगरे स्मारकाचा विषयही उपस्थित केला आहे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले आहेत यावेळी मोठ्या संख्येने अन्यायग्रस्त महादेव कोळी जमातीचे समाजबांधव उपस्थित होते.
0 Comments