संभाजी पुरीगोसावी (जामनेर तालुका) प्रतिनिधी. जामनेर येथील पोलीस स्टेशनचे सिंघम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची विनंती स्थान म्हणून अहमदनगरला बदली झाली, असून त्यांच्या जागेवर जळगांव सायबर ला असलेले पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार हे जामनेर पोलीस ठाण्यात रुजू झाले आहेत, त्यांनी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्याकडून जामनेर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सलग जामनेर पोलीस ठाण्यात तीन वर्षे कार्यकाळ पूर्णता झाल्यामुळे त्यांनी विनंती बदली घेतली आहे, त्यांनी आपल्या कार्यकाळात अतिक्रमणाचा विषय उत्तम प्रकारे हाताळून गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना आळा घातला होता, त्याचबरोबर अनेक गुन्हे उघडकीस आणले पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे जामनेर तालुक्यांत सिंघम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख झाली होती, अशा प्रकारे त्यांनी आपल्या कामकाजाचा ठसा चांगलाच उमटवला होता, सलग तीन वर्ष त्यांची जामनेर पोलीस ठाण्यात झालेली उत्कृंष्ट सेवा ही नेहमीच आठवणीत राहणार आहे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने निरोप देताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रूं पाहायला मिळाले, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पदभार सोडला असून, मावळते पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी नव्याने आलेले पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार याचे स्वागत करीत पदभार सोपविला आहे,
0 Comments