LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरीत राष्ट्रवादीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर हजारो रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

 


पंढरपूर/प्रतिनिधी

पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास शॉपिंग सेंटर, भक्ती मार्ग रोड येथे करण्यात आले होते. 

या शिबिराचे उद्घाटन नेत्र रोग तज्ञ डॉ. मनोज भायगुडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश सुडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, डॉ. किरण बहिरवाडे, चेस्टर स्पेशालिस्ट डॉ. सुरज गायकवाड, डॉ. हर्षदा माने, परिचारिका स्नेहा कसबे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय म्हमाने, बाळू देवमारे, रशीद शेख, ओम कदम, सचिन सोलंकी, सागर बाबर, बाबू लेंडवे उपस्थित होते.

या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या आदेशाने शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर शहर यांच्यावतीने करण्यात आले होते.

या शिबिरात आरोग्य तपासणी, डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लाभ घेतला.

आषाढी यात्रेनिमित्त राज्य सरकारच्या वतीने पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले. यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवला व त्या शिबिराचा लाभ घेतला. आषाढी यात्रेनंतर मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात पसरलेल्या घाणेच्या साम्राज्यामुळे तसेच सतत सुरू असलेल्या पावसामुळे पंढरपुरातील नागरिक सर्दी,खोकला,ताप यामुळे त्रस्त होते. यात्रा संपल्यानंतर अशी परिस्थिती कायमच निर्माण होती. ही नागरिकांची समस्या लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे उचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी मोफत आरोग्य तपासणी, उपचार, मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा पंढरपूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments