पंढरपुरच्या ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचा उपक्रम
पंढरपूर- 'गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये रविवार, दि.२७ एप्रिल २०२५ रोजी ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान तर्फे ‘जागतिक पशुवैद्यक दिन’ साजरा करण्यात येणार आहे.' अशी माहिती ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे यांनी दिली.
या कार्यक्रमाअंतर्गत सकाळी ९ वा. नोंदणी व अल्पोपहार, स.९.३० वा व्हेट्रिना हेल्थ केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश घाडीगावकर हे ‘किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी पशुवैद्यकापुढील आव्हाने’ या विषयावर तसेच स.१० वा. मुंबई मधील जिओ प्लॅटफॉर्मचे महाव्यवस्थापक डॉ. संतोष वाघचौरे हे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी वापर’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन विभागाचे माजी सहआयुक्त डॉ. महेश बनसोडे हे राहणार आहेत. त्यानंतर स्व. डॉ. सुहास देशपांडे जीवन गौरव व स्व. डॉ. चंद्रकांत निंबाळकर उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्काराचे वितरण पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे व स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते होणार असून यासाठी पशुसंवर्धन पुणे विभागाचे सहआयुक्त डॉ. समीर बोरकर हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, सातारा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, सोलापूर पशुसंवर्धन विभागाचे प्रभारी उपायुक्त डॉ. विशाल येवले, सोलापूरचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, सांगलीच्या पशुधन विभागाचे सहा.आयुक्त डॉ. विजय ढोके, सोलापूर पशुधन विभागाचे सहा. आयुक्त डॉ. भास्कर पराडे यांच्यासह इतर मान्यवर या भव्य व दिव्य अशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे, सचिव डॉ. अनिल सरदेशमुख व मार्गदर्शक डॉ. टी.एन. बेले त्यांच्यासह ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून महाव्हेट सोलापूरचे अध्यक्ष डॉ. शहाजी ठवरे, पंचायत समिती पंढरपुरचे पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. प्रियांका जाधव-कोळेकर व पंढरपूरच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. विलास डोईफोडे हे लाभले आहेत. स्व.सुहास देशपांडे जीवन गौरव पुरस्कार हा पुरस्कार विजेते पशुसंवर्धन विभागाचे माजी सहसंचालक डॉ. सी.आर. कापडी यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
0 Comments