पंढरपूर, येथील पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील सामाजिक चळवळी चे कार्यकर्ते म्हणून सुनिल वाघमारे यांच्या कडे पाहीले जाते. पंढरपूर तालुक्यातील अनवली गावचे रहिवासी आहेत. मागील पाच वर्ष त्यांनी सरपंच म्हणून काम केले.या काळात त्यांनी स्मशानभूमी, समाज मंदिर, सिध्दनाथ देवळाची डागडुजी, लाईट, शुध्द पाणी या प्रकारच्या ग्रामस्था च्या सोयी वाघमारे यांनी निस्वार्थी केली आहे.सुनिल वाघमारे यांना पूर्वी ही त्यांच्या सामाजिक चळवळी चे काम पाहून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.सुनिल वाघमारे हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, यांच्या जीवनावर ते व्याख्यान देत ते समाजातील युवकांना प्रबोधन हि करतात.सुनिल वाघमारे यांनी सामाजिक कार्यात व चळवळीत वाहून घेतले आहे.त्याचा स्वभाव मनमिळाऊ आहे, कुठल्याही समाजातील नागरिक त्यांच्या कडे गेलात तर ते त्याचे काम बिनधास्त करतात. २७, एप्रिल रोजी पुणे येथे सुनिल वाघमारे यांना प्रबुद्ध पुरस्कारा ने सन्मानीत करण्यात येत आहे.
0 Comments