भाळवणी दि.19 : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. साखर कारखाना कार्यस्थळावर मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत कारखान्याचे चेअरमन मा. श्री. कल्याणराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर कर्मचारी वैद्यकीय आरोग्य तपासाणी शिबीराचे उद्घाटन कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन मारुती भोसले, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जनकल्याण हॉस्पीटलचा सर्व स्टाफ, डॉ. सुधीर शिनगारे , कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. जयश्री शिनगारे, डॉ. आनंद कुलकर्णी, डॉ.अमृता म्हेत्रे, डॉ. कु. शुभम शिनगारे, डॉ. कु. अंजली नागटिळक या डॉक्टरांच्या उपस्थितीत कारखान्यांतील कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कारखाना कॉलनीतील कामगारांचे कुटूंबातील सदस्याचीही आरोग्य तपासणी करुन त्यांना मोफत औषधे देण्यात आली. तसेच कारखान्याचे संचालक मोहन बापू नागटिळक यांच्या कन्या डॉ. कु. अंजली नागटिळक व डॉ. सुधीर शिनगारे यांच्या कन्या डॉ.कु.शुभम शिनगारे यांना डॉक्टर पदवी मिळाल्यामुळे कारखान्याचे चेअमरन मा.श्री. कल्याणराव काळे साहेब यांच्या वाटीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री मोहन नागटिळक, शंकरमहाराज चव्हाण, अमोल माने, अरुण नलवडे, विक्रमसिंह बागल, युवराज दगडे, भारत आंबुले, अर्जुन जाधव, राजाराम माने,कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक श्री.पी.डी.घोगरे व कारखान्याचे अधिकारी कर्मचारी, कामगार वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments