तीनशे साठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी किल्ले पुरंदरवर एका मानवी वादळाचा जन्म झाला. जीवन वादळी आणि मृत्युही वादळी. छत्रपती शंभुराजे हे चालते बोलते वादळ होते. त्यांच्या शत्रुला तर शंभुराजे पेलले नाहीतच पण चरित्रकारांना ही पेलले नाहीत. पण कला आणि साहित्य क्षेत्राने केलेला 300 वर्षांचा अन्याय उखडून फेकून देत अलीकडच्या काळात शंभुराजांची प्रतिमा पुन्हा एकदा झळाळुन उठली आहे. इतिहास पुनर्लेखनाद्वारे होत असलेल्या नवनवीन सत्यान्वेषी संशोधनातून खरे खुरे शंभुराजे समोर येत गेले आणि त्यांची पूर्वीची चरित्रे कस्पटासारखी या वादळाच्या गर्तेत कुठल्या कुठे उडून गेली. आज आपला जीवनभराचा संघर्ष मृत्युनंतर ही कायम ठेवत शंभुराजे एका तेजस्वी आदर्शाच्या रुपात समोर आहेत. असामान्य विद्वत्तेचं अलौकिक बुद्धीमत्तेचं उदाहरण आहे. छत्रपती संभाजीराजांनी रणांगणावर शौर्य गाजवलं. युद्धनीती, राजनीती कौशल्यांचा उपयोग करुन नऊ वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज, तसंच अंतर्गत शत्रूंविरुध्द लढा दिला. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. आपला पुत्र आपल्यापेक्षा सवाई व्हावा ही प्रत्येक पित्याची इच्छा असते.थोरल्या छत्रपतींच्या बाबतीत हे साध्य होणे किती कठीण होते.पण शंभुराजे शौर्य, पराक्रम ,धडाडी, रणकौशल्य, बुद्धिमत्ता सर्वच बाबतीत थोरल्या छत्रपतींना साजेसा पुत्र सर्वोत्तम पुत्र स्वराजचे युवराज राजे छत्रपती शंभूराजे यांचे जीवन देशासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मुजरा....💐
0 Comments