पंढरपुर (प्रतिनिधी) : लातुरमधून पळवून आणलेल्या एका बालकाला आरोपीने पंढरपुरात सोडून पलायन केले होते, हा बालक पंढरपुरात फिरताना आढळताच येथील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी केलेल्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
भुवैकुंठ पंढरपूर नगरीत माणुसकीचा जिवंत झरा मनात असणारी काही माणसं आहेत, यापैकीच एक म्हणजे येथील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक गणेश अंकुशराव.
गणेश अंकुशराव यांनी पंढरपुरातील अनेक अनाथ, निराधार, वंचितांवर ओढवलेल्या विविध प्रकारच्या संकटातून सोडवल्याचे अनेक किस्से आहेत, याचबरोबर हरवलेल्या अनेक लहान मुलांनाही त्यांच्या आई-वडिलांकडं सुखरूपपणे पोहोचवण्याचं पुण्यकर्मही त्यांनी अनेकदा केलंय. नुकतंच एका आरोपीने पळवून आणलेल्या अवघ्या तीन वर्ष तीन महिन्यांच्या बालकाला सुरक्षितरित्या त्यांच्या पालकांकडं सुपूर्द करण्यामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली आहे. जाणुन घ्या नेमकं काय घडलं ते ...
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 26 मे 2025 रोजी स्वरूप भीमाशंकर स्वामी वय वर्षे 3 वर्षे 3 महिन्याचा मुलगा हनुमान मंदिर गुमास्ता काॅलनी कव्हा रोड लातूर येथुन सकाळी 10/30ते 11 वाजण्याच्या सुमारास हरवला होता त्या लहान मुलाचा आई आणि वडीलांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार केलेली केलेली होती.
लातूर पोलिसांकडून स्वरुप स्वामी हा लहान असल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लाऊन पळवून नेलेले असल्याची लातूर पोलिसांना खात्री पटली. लातूर पोलिसांनी या मुलाच्या शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आलेले होते.
या लहान मुलाचा पोलीस प्रशासन ही शोध घेत होते.
हा मुलगा पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठावरील आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात आदिवासी कोळी समाजाचे नेते गणेश यांना एकटाच फिरत असल्याचे लक्षात आले.
भीमा नदीचे पात्र हे संपूर्ण पाण्यानें भरलेले असल्यामुळे तो मुलगा चंद्र भागेच्या पाण्याच्या पात्रात जाईल म्हणून त्या मुलाला उचलून बाजूला आणुन विचार पुस केली त्या लहानशा चिमुकाल्या स्वताचे नाव सांगता येत नव्हते गणेश अंकुशराव यांनी सदर मुलास घेऊन सर्वत्र त्या मुलाचा पालकाचा शोध घेतला.
गणेश अंकुशराव यांनी ताबडतोब पंढरपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधुन वरील मुलाची माहिती फोटो आणि व्हिडिओ माध्यमातून दिली
लगेच हा सदरचा मुलगा हा लातूर येथून हरवल्याची मिसींग तक्रार दाखल असल्याची पंढरपूर शहर पोलीसांन कडून सांगण्यात आले.
लातूर शहर पोलीस ठाणे येथे मिंसीग दाखल असलेल्या पोलीस ठाण्याशी संबंधित मुलाचा नातेवाईकांना मुलाची माहिती दिली.
आपला मुलगा हा पंढरपूर येथे सुखरूप असल्याचे समजाच लातूर शहर पोलीस पथक एका संशीयत आरोपीसह मुलाचे नातेवाईक पंढरपूर कडे तातडीने रवाना झाले.
संबंधित लहान मुलास शहर पंढरपुर पोलीसांचा मदतीने लातूर शहर पोलीसांचा नातेवाईक समवेत स्वाधीन करण्यात आले.
आज स्वरूपला पाहताच आईने मोठ्याने हंबरडा फोडला. आपल्या लेकराची सुरक्षितरित्या परत मिळवून दिल्याबद्दल या मातेनं समाजसेवक गणेश अंकुशराव विजय अभंगराव गणेश माने महेश माने चैतन्य तारापूरकर आप्पा करकमकर रोहित करकमकर कृष्णा माने यांचे व पोलिसांचे आभार मानले.
3 वर्षे 3 महिन्याचा स्वरूप स्वामी हा लातूर वरुन पंढरपूर ला आलाच कसा ? या कटातील आरोपी समवेत आणखीन कोणी आहे का? याचा शोध आता लातूर शहर पोलीस घेत आहेत.
0 Comments