LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्वेरीमध्ये ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा





पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या कॅम्पसमध्ये वृक्षारोपण करून ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात आला.
         जगभर ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जात असताना परंपरेनुसार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये गुरुवार, दि. ५ जून २०२५ रोजी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या  सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण दिवस स्वच्छता व वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. स्वेरी कॅम्पसमध्ये विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संरक्षणाबाबतची  जबाबदारी पार पाडण्यात आली. यावेळी विद्यार्थी व संस्थेतील कर्मचारी यांना आपल्या परिसरात झाडे लावण्यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, प्रा.एस.आर.गवळी, ग्रीन टीमचे समन्वयक प्रा.कुलदीप पुकाळे, राष्टीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.एम. आवताडे, प्रा. ए.बी. चौंडे, प्रा. एस. डी. इंदलकर, प्रा. बी. टी. गडदे, इतर प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आदी उपस्थित होते. स्वेरी अभियांत्रिकीतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’ चे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments