मनुष्य कर्माने किंवा पदाने कितीही जरी मोठा असला तरी त्यांनी आपली संस्कृती विसरून चालणार नाही .
"भूतदया परमो धर्म " या उक्तीनुसार प्राण्यांनाही आपल्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. कारहूनवी सण (बैलपोळा) आजचा हा मंगल दीन प्रत्येक शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा खरा उत्सव असतो, ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या बैलांना खूप छान सजवून धजवून पूर्ण जल्लोषात साऱ्या गावभर मिरवणूक काढत असतो.
*अगदी तसेच सोलापूर शहरातील लष्कर भागातील सुनील कुरमय्या काडे हे बांधकाम आणि वीटभट्टी वर काम करत असतात त्यांच्या कामात दिवसरात्र गाढवांची साथ लाभते. आपल्या सोबत वर्षभर निस्वार्थीपणे काबाड कष्ट करून आपल्यासाठी राबणाऱ्या या जीवाला आपण काहीतरी देणे हे आपले आद्य कर्तव्य समजून आज कारहूनवी (बैलपोळा) निमित्त त्यांच्याजवळ असणाऱ्या जवळपास २५ गाढवांना सजवून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, युवा नेते जॉन फुलारे, युवा नेते वाहिद बिजापूरे, बोड्डू मालक शेख, योहान कानेपागूल यांच्या हस्ते पुरणपोळी, आणि मिष्ठान्न खाऊ घालून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.*
यावेळी तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, सुरेश फरड, रवी जंगम, योहान सातालोलू, व्यंकटेश बोम्मेन, भीमराज गोण्यांल, देविदास म्हेत्रे, प्रकाश जंगम, रामू म्हेत्रे, रजत आसरेड्डी,अजय खाडे, आकाश फलटण, उमेशकुमार, अब्बू म्हेत्रे, आनंद शिरोळू यांच्यासह लष्कर भागातील नागरिक बंधु भगिनी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
0 Comments