पंढरपूर- 'छत्रपती शिवाजी महाराजांचे कष्ट, गुणग्राहकता, न्याय-निवाडा, नेतृत्व, परिश्रम, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकाभिमुख प्रशासन अशा विविध गुणांचे परीक्षण करता त्यांचा जगात आदर्श घेतला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड, किल्यांच्या बांधकामातून सिव्हील इंजिनिअरिंगचा उभा केलेला अदभूत नमुना दिसून येतो. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी. महाराजांची प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी व अनुकरण करण्यासारखी आहे.' असे प्रतिपादन स्वेरी व्यवस्थापनाच्या अंतर्गत असलेल्या खेड (ता. उत्तर सोलापूर) मधील स्वामी विवेकानंद इन्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य डॉ. यु.एस. सुतार यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदवी व पदविका) व कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी व पदविका) मधील राष्ट्रीय सेवा योजना व क्रिडा विभागाच्या वतीने स्वेरीमध्ये ३५२ वा 'राज्याभिषेक दिन' तथा 'शिवस्वराज्य दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी भव्य शिवमुर्तीचा अभिषेक व पूजन प्राचार्य डॉ. यु.एस सुतार व लक्ष्मण कराळे (वस्ताद) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम वर्ष इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी 'शिवराज्याभिषेक दिना'चे महत्व सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. प्रवेश द्वाराजवळ गुलाबी, पिवळ्या व भगव्या रंगांच्या झेंडूच्या फुलांचा वापर करून आकर्षक रांगोळी काढली होती. यावेळी बाळासाहेब भोसले, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. के. बी. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद, एमबीएचे विभागप्रमुख डॉ. के. पी. गलानी, स्वेरीचे परीक्षा नियंत्रक डॉ. एस.ए. लेंडवे, प्रा.अंतोष द्याडे, प्रा. यु.एल. अनुसे, प्रा. पी. व्ही. मोरे, प्रा. प्रकाश अंदोरे, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.बी.चौंडे, डॉ. एम.एम.आवताडे, डॉ.डी.एस.चौधरी यांच्यासह प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, अभियांत्रिकी व फार्मसीचे विद्यार्थी, पालक वर्ग आदी उपस्थित होते.
0 Comments