पंढरपूर- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष (पदवी), पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी (एम.टेक ), एम.बी.ए. व एम.सी.ए. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने स्वेरीज् कॉलेज ऑफ ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) मध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. बळवंत व माजी तंत्रशिक्षण संचालक डॉ. एन. बी. पासलकर यांच्या शुभहस्ते व हायर एज्युकेशनचे माजी सहसंचालक व सचिवालयातील माजी ओएसडी डॉ. विजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचे’ उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी तंत्रशिक्षण संचालक डॉ. एन. बी. पासलकर उपस्थित पालक व विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत मांडत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, इतर मान्यवर, पालक व स्वेरीच्या प्रवेश प्रक्रीयेमधील उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. उदघाटनानंतर प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ.करण पाटील यांनी आलेल्या पाहुण्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ.करण पाटील म्हणाले की, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बी.पी. रोंगे सरांनी १९९८ साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करावे याबद्धल येथील तज्ञ प्राध्यापकांद्वारे अचूक मार्गदर्शन करण्यासाठी या कक्षाची निर्मिती केली आहे. तसेच पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीत अथवा प्रशासकीय क्षेत्रात कशी निवड होईल व उत्तम करिअर कसं घडेल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न होत आहेत. प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे साहजिकच प्रत्येक वर्षी स्वेरीच्या यशाचा आलेख देखील उंचावत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अभियांत्रिकी, एम.बी.ए., एम.सी.ए. व विधी (लॉ) या विद्याशाखांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी तसेच शैक्षणिक शुल्क, शासनाच्या विविध स्कॉलरशिप्स, विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृह सुविधा अशा विविध बाबीसंदर्भात चर्चा व मार्गदर्शन होण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या मार्गदर्शन कक्षात उच्चशिक्षित प्राध्यापक वर्गाची टीम सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सज्ज असणार आहे. यामुळे एकाच छताखाली सर्व अचूक माहिती मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची आवड/ क्षमता, पालकांची निवड आणि प्राध्यापकांशी असणारा समन्वय/ संपर्क या बाबी या प्रक्रियेत अत्यंत महत्वाच्या आहेत. स्वेरी संचलित अभियांत्रिकी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष व पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापासून ते प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, यांची पडताळणी, शैक्षणिक पात्रता, प्रवेश घेताना तसेच महाविद्यालयांची निवड करताना विद्यार्थ्यांनी करिअरचा विचार करून नेमक्या कोण-कोणत्या महत्वाच्या बाबी पहाव्यात व तपासाव्यात, कॅप राउंडस्, कॅम्पस प्लेसमेंट, ब्रँचची निवड, मागील वर्षातील विविध विभागांचे कट ऑफ मार्क्स या व इतर संबंधित गोष्टींबाबत विद्यार्थी व पालक यांना योग्य व खात्रीशीर मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे.’ स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘विद्यार्थी व पालकांचा अभ्यास, विचार आणि मानसिकता तसेच डिजिटल टेक्नोलॉजीचा विपरीत परिणाम होऊ नये व वस्तुस्थितीची जाणीव व्हावी. मनाचा गोंधळ उडू नये व करिअरच्या दृष्टीने कक्षातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे एक ठोस निर्णय घेता यावा या हेतूने या कक्षाची निर्मिती केली आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ ऑफ इंजिनिअरींग (अॅटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ प्राध्यापक हे मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन कक्ष विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नक्कीच फायदेशीर ठरेल यात शंका नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी मोबा. क्र. ९५९५९२११५४ व ९१६८६५५३६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments