LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

बा विठ्ठला मंदिर समितीच्या भ्रष्ट कारभाऱ्यांना सद्बुद्धी दे ! गणेश अंकुशराव यांचे पांडुरंगाला साकडे



पंंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपुरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधील भोंगळ कारभारामुळे संबंध महाराष्ट्रातून मंदिर समिती प्रशासनावर टीका होत असतानाच आता पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सुध्दा मंदिर समितीच्या गैरकारभाराविरूध्द यल्गार पुकारला आहे.

दर्शन रांगेतील भाविकांना मारहाण, सुरक्षा कर्मचाऱ्यांची मुजोरी, व्हीआयपी दर्शनाचा वाद, गोशाळेतील गोमाता व गोवंशाची सुरक्षा धोक्यात, स्वच्छतेच्या टेंडर मधील घोटाळा, मंदिर संवर्धनाच्या कामात घोटाळा आणि निकृष्ट दर्जाचे कामामुळे ऐन पावसाळ्यात मंदिरात होणारी गळती अशा विविध मुद्द्यांवरून गेल्या अनेक दिवसांपासून गणेश अंकुशराव यांनी रान उठवलेलं दिसून येत आहे. या विरूद्ध त्यांनी अनेकदा मंदिर समिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही धारेवर धरलं होतं.

आज अंकुशराव यांनी थेट श्रीविठ्ठलाच्या चरणावर निवेदन ठेवून "बा विठ्ठला आता तूच शासनाला सद्बुद्धी दे आणि मंदिर समिती प्रशासनाच्या भोंगळ कारभार उजेडात आणून दोषींना कडक शासन करण्यासाठी तुझी काठी उचल !" अशी प्रार्थना गणेश अंकुशराव यांनी केलीय.

............
मा.संपादक, पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय प्रसिध्दी माध्यमावर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
कळावे ,
 आपला 
 गणेश अंकुशराव 
मोबाईल: +91 93702 71730

Post a Comment

0 Comments