दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय मिळालेल्या बातमीच्या आधारे अवैधरित्या मावा गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधी तंबाखू साठा बाबत गोपनीय बातमी मिळाल्याने पंढरपूर तालुका पोलिसांनी रेड केली असता मौजे खर्डी या गावी देशी पान शॉप या पान दुकानावर रेड करून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे एकूण दोन
पोत्यामध्ये भरून अवैधरित्या मावा तयार करण्याचे साहित्य तसेच गुटखा तसेच सुगंधी तंबाखू असा मावा विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या परिस्थितीमध्ये मिळून आला सदर ठिकाणी पोलिसांना एकूण दोन पोते मावा आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सुगंधी तंबाखू असा एकूण 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून एका व्यक्तीला ताव्यामध्ये घेतलेला असून आरोपी विरुद्ध अन्न व औषधी द्रव्य अधिनियम तसेच बी एन एस एस कलमअन्वय गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याबाबत अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी श्री भुसे साहेब यांनी फिर्याद नोंदवली आहे सदर गुन्ह्यात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आली आहे
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळेसाहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर API श्री शहाजी गोसावी पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले asi श्री आबा शेंडगे सुधाकर हेंबाडे पोलीस अंमलदार संजय गुटाळ विजयकुमार आवटी हासेन नदाफ विलास घाडगे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे

0 Comments