LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *खासदार प्रणिती शिंदे यांचा संसद परिसरात गॅस टंचाईवर हल्लाबोल; “नरेंद्रही गायब, सिलेंडरही गायब” घोषणांनी केंद्र सरकारला धारेवर धरत तात्काळ पुरवठा सुरळीत करण्याची जोरदार मागणी*



नवी दिल्ली, 25 मार्च 2026

देशभरात घरगुती गॅस (LPG) सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅस एजन्सीसमोर लांबलचक रांगा लागलेल्या दिसत असून, अनेक ठिकाणी वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने सामान्य जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे.
या गंभीर प्रश्नावर आज काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी नवी दिलीतील संसद परिसरात जोरदार आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करत “नरेंद्रही गायब, सिलेंडरही गायब” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला त्यांच्या वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप करत, वाढत्या महागाईसोबतच आता गॅस टंचाईने नागरिकांचे जगणे अधिकच कठीण झाल्याचे सांगण्यात आले.

खासदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत, गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी केली. “सामान्य कुटुंबांना रोजच्या जगण्यासाठी गॅस हा अत्यावश्यक घटक आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी,” असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस आणि INDIA आघाडीने या प्रश्नावर सरकारला जाब विचारत, जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या धोरणांचा तीव्र निषेध केला आहे.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments