LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी ....


               समतानायक, आद्य समाजसुधारक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९५ वी जयंती महाराष्ट्र विरशैव सभा या संघटनेच्या माध्यमातून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मा. नगरसेवक सन्माननीय श्री. निलराज डोंबे यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय श्री. नंदकुमार कटप उपस्थित होते.

                महाराष्ट्र विरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. ॲड. राजेश भादुले, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र भिंगे, ज्येष्ठ मार्गदर्शक मा. श्री. राजकुमार जेठे सर यांनी महात्मा बसवेश्वर यांचे विचार व कार्याबद्दल समायोजित मनोगत व्यक्त केले.

               यानंतर समाजबांधव व ICICI बँकेचे मॅनेंजर मा. श्री. राजेश हुंडेकरी यांचा चिरंजीव श्रेयश S.S.C. परीक्षेत ९०% मार्क्स प्राप्त करत उत्तीर्ण झाल्याबद्दल चि. श्रेयसचा अभिनंदनपर व शिवसेना शिंदे गटाचे नेते मा. श्री. ओंकार बसवंती यांनी लिंगायत स्मशानभूमीची सुधारणा करण्याकरिता आपल्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून १० लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल बसवंती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता संघटनेच्या माध्यमातून यथोचित सन्मान करण्यात आला.

               कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संघटनेचे शहराध्यक्ष श्री. विशाल आर्वे यांनी केले. तर शेवटी उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष श्री. धनंजय मेनकुदळे यांनी मानले. याप्रसंगी शिवसेनेचे युवानेते श्रीनिवास उपळकर, सौरभ भादुले, आनंद मेनकुदळे, अनिल डोंबे, उमेश वायचळ, बसवराज मरळे, प्रशांत मेनकुदळे, सोहम भिंगे, महेश विभुते, विश्वनाथ कावळे, राजाभाऊ शेटे, संजय म्हमाणे, विशाल डोंगरे, वेदांत पाटील, विश्वास ठिगळे, सिद्धेश्वर शिळ्ळे, प्रथम भिंगारे, शिरीष पंतोजी, सुरज पावले आदी मान्यवर व बसवभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments