LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*मुली व महिलांच्या संपुर्ण सुरक्षेसाठी निर्भया पथकाची विशेष मोहीम "*



पंढरपूर प्रतिनिधी-- दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर २०१३ साली निर्भया फंडची स्थापना करण्यात आली. सदर फंडामधुन महीलांचे सुरक्षेकरीता निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असुन याची सुरुवात मुंबई येथुन २६ जानेवारी २०२२ रोजी पासुन करण्यात आली आहे. याच धर्तीवर निर्भया पथक संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत करण्यात आले. दिनांक ०९/०४/२०२६ रोजी पंढरपूर विभागमधील निर्भया पथकाची पुर्नः रचना करण्यात आली असुन निर्भया पथकाच्या प्रभारी म्हणुन म. पोलीस उपनिरीक्षक / सुप्रिया यादव / रावण यांनी मा. सहा. पोलीस अधिक्षक / प्रशांत डगळे, (भा.पो. से) यांचे मार्गदर्शनाखाली पदभार स्वीकारला आहे. तसेच सदर निर्भया पथकातील इतर सदस्य पोकॉ/१२३६ सावंत, पोकॉ/१३९५ कुचेकर, चा. पोकॉ/७२ टिंगरे, म.पोकॉ/१३११ वाघमारे, म. पोकॉ/२०४८ काझझी अशी रचना आहे. निर्भया पथकामार्फत मुली व महीलांवरील अत्याचार, छेडछाड, विनयभंग, टिंगलटवाळी, मारहाण, सोशल मेडीआद्वारे ब्लॅकमेल, पाठलाग, शारिरीक व मानसिक त्रास इत्यादीबाबत सदैव तत्पर राहुन पंढरपूर विभागातील प्रत्येक शाळा, कॉलेज तसेच खेडे गाव पर्यत पोहोचण्याचा निर्धार पथकाने केला असुन यासाठी एक क्यु आर कोड प्रत्येक शाळा, कॉलेजेस, गाव, शहरांमध्ये पोष्टरद्वारे लावण्यात येणार असुन प्रत्येक मुलीला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्भया पथकापर्यत पोहचण्याचा मार्ग सुखकर करण्यात आला आहे. तसेच निर्भया पथकाचे कार्यालय हे पंढरपूर शहर पोलीस ठाणेजवळील "निर्भया कक्ष" असे असुन सदर ठिकाणी पथक नेहमी २४ तास कार्यरत राहील.

Post a Comment

0 Comments